साई भक्तांसाठी खुशखबर…

अहमदनगर : साई भक्तांसाठी एक खुशखबर आहे. शिर्डी येथे होणाऱ्या विमानतळाच ‘साईबाबा एअरपोर्ट’ अस नामकरण करण्यात आल आहे. आज याबाबतचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

दरम्यान, बहुप्रतीक्षित शिर्डी विमानतळ अखेर व्यावसायिक विमान उड्डाणासाठी सज्ज झालं आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने(एमएडीसी) याबाबतची अधिकृत घोषणा केली नुकतीच आहे. शिर्डी विमानतळावरून पुढील महिन्याच्या सुरुवातीला विमान प्रवासी सेवेला सुरुवात होणार असून ‘एअर इंडिया’ यात पुढाकार घेणार आहे. त्यानंतर ‘ट्रूजेट’सुद्धा येथून विमानसेवेला सुरूवात करणं अपेक्षित आहे, अशी माहिती ‘एमएडीसी’चे उपाध्यक्ष आणि कार्यकारी संचालक सुरेश काकनी यांनी काही दिवसांपूर्वीच दिली होती.