पंजाब किंग्सच्या चाहत्यासाठी खुशखबर! कर्णधार के एल राहुल लवकरच संघात परतणार

दिल्ली : कोरोनाच्या विळख्यात सापडलेल्या आयपीएल स्पर्धेत पंजाब किंग्स संघासाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. पंजाब संघाचा कर्णधार के एल राहुल हा लवकरच संघात परणार असल्याची माहीती समोर आली आहे. रविवारी झालेल्या दिल्लीविरुद्धच्या सामन्यात पंजाब किंग्स संघाचा नियमीत कर्णधार के एल राहुल आजारपणामुळे खेळु शकला नाही.

आयपीएल स्पर्धेचा पहिला टप्पा यशस्वीपणे पार पडला. मात्र दुसऱ्या टप्प्यात पंजाब किंग्सचा कर्णधार अपेंडिक्सच्या दुखण्यामुळे रुग्णालायात दाखल झाला होता. या आजारातुन बरे होण्यासाठी राहुलला शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्यानंतर एका आठवड्यात तो संघात परतु शकेल असे डॉक्टरांनी सांगितले आहे.

पण राहुलला संघात येण्यापुर्वी कोरोना नियमानुसार विलगीकरणाचा कालावधी पुर्ण करावा लागेल. या संदर्भात आयपीएल नियोजन समितीशी बोलुन पंजाब किंग्स संघाचे व्यवस्थापन राहुलच्या विलगीकरणाचा कालावधी निश्चीत करतील. राहुलच्या अनुपस्थितीत दिल्ली विरुद्धच्या मंयक अग्रवालने संघाचे नेतृत्व केले होते. यासामन्यात दिल्लीने पंजाबचा ७ गडी राखुन पराभव केला होता.

महत्वाच्या बातम्या