लातूरकरांसाठी खुशखबर; उजनी धरणाचे पाणी लातूर शहरात येणार

amit deshmukh

लातूर : अनेक दिवसापासून प्रलंबीत असलेला लातूर शहराचा पाणीप्रश्न कायमचा सुटणार आहे. उजनी धरणाचे पाणी लातूरला आणण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले. विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.

शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरुपी सुटावा यासाठी उजनी धरणाचं पाणी धनेगाव मार्गे लातूर शहरात आणण्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा विषय मांडणार आहोत. आणि त्याला मंत्रीमंडळाची मान्यता घेणार अशी माहिती पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिली. नुकत्याच औरंगाबाद इथे पार पडलेल्या नियोजन समितीच्या बैठकीत लातूर जिल्हा नियोजन समितीला २७५ कोटीचा भरीव निधी मंजूर करून घेण्यात आला. या निधीतून लातूर जिल्ह्यात विविध विकास कामं अधिक गतीनं मार्गी लावणार असल्याचं ते म्हणाले.

मराठवाड्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यात पाणी प्रश्न पेटलेला आसतो. काही वर्षापुर्वी लातूर शहराला रेल्वेद्वारे पाणी पुरवण्याची वेळ आली होती. अशा प्रकारची भीषण परिस्थीती लातूरकरावर पुन्हा येऊ नये यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील राहणार आहोत असे ते यावेळी म्हणाले. यासाठी मंत्रीमंडळाच्या बैठकीत आपण विषय मांडणार आहोत असे पालकमंत्र्यानी सांगितले.

महत्वाच्या बातम्या