कॅटरिना अन् विकीच्या चाहत्यांसाठी खुशखबर..!त्यांच्या लग्नाची झाली लगबग सुरू

कॅटरिना अन् विकीच्या चाहत्यांसाठी खुशखबर..!त्यांच्या लग्नाची झाली लगबग सुरू

vickky

मुंबई : सध्या कॅटरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या प्रेमप्रकरणाची चर्चा सर्वत्र सुरू आहे. एका वृत्तानुसार, हे दोघे चाहत्यांना खुशखबर देण्याच्या तयारीत असून लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. दोघांच्या घरी लग्नाची तयारी सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे.

एका प्रसिद्ध वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, बॉलिवूडची प्रसिद्ध जोडी कॅटरिना आणि विकी लवकरच विवाह बंधनात अडकणार असून दोघांच्या घरी लवकरच सनई चौघडे वाजणार आहेत. इतकेच नव्हे, तर कॅटरिना आणि विकी कौशलने लग्नाच्या तयारीला सुरुवात केली आहे. तसेच दोघांचेही लग्नाचे कपडे प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यासाची यांनी डिझाईन केले आहेत. सध्या ते कपड्यांसाठी फॅब्रिक निवडत आहेत. याबद्दल मिळालेल्या माहितीनुसार, कॅटरिना रॉ सिल्क फॅब्रिक वापरणार आहे. कॅटरिना आणि विकीचे लग्न नोव्हेंबर, डिसेंबर दरम्यान होईल, ज्यामध्ये कॅटरिना सुंदर लेहंगा घालणार आहे. तत्पूर्वी कॅटरिना आणि विकीच्या रोका कार्यक्रमाचीही जोरदार चर्चा माध्यमांत रंगली होती. दोघांनी गुपचूप साखरपुडा उरकल्याचीही बातमी समोर आली होती. कॅटरिना आणि विकी अनेकदा सोबत फिरतानाचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळाले होते. नुकतेच दोघे विकी कौशलच्या ‘सरदार उधम’ चित्रपटाच्या स्क्रीनिंगवेळी सोबत दिसून आले होते.

कॅटरिना आणि विकीच्या लग्नाच्या बातमीने त्यांचे चाहते आनंदी झाले असून सगळ्यांना या शाही विवाहसोहळ्याची उत्सुकता लागली आहे. अभिनेत्री कॅटरिना कैफ हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध आहे. आपल्या सौंदर्याने आणि दमदार अभिनयाने तिने चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अलीकडेच ती आगामी चित्रपट ‘सूर्यवंशी’च्या प्रमोशनसाठी रणवीर सिंगच्या ‘द बिग पिक्चर’ कार्यक्रमात पोहोचली होती. यावेळी कॅटरिना रणवीर सिंगसोबत धमाल करताना दिसून आली होती. चित्रपटात कॅटरिना कैफसोबत अक्षय कुमारसुद्धा प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.आता या शाही विवाहसोहळ्याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

महत्त्वाच्या बातम्या