जिओ युजर्ससाठी आनंदाची बातमी

टीम महाराष्ट्र देशा – स्मार्ट फोनवर सदासर्वदा ऑनलाईन राहणार्सांठी एक खुषखबर आहे. तुमचा जिओ प्लॅन संपत आला असेल अथवा संपला असेल तर काळजी करू नका.

‘फोन पे’ या पैसे ट्रान्सफर करणार् ॲपकडून जिओ ग्राहकांना रिचार्जवर कॅशबॅक ऑफर देण्यात आली आहे. तीनशे किंवा त्याहून अधिकचा रिचार्ज ‘फोन पे’ च्या माध्यमातून केल्यास ७५ रूपयांचा कॅशबॅक मिळणार आहे. म्हणजेच ३९९ चा रिचार्ज ‘फोन पे’ द्वारे केल्यास ग्राहकांना हा रिचार्ज ३२४ मध्ये मिळणार आहे.

ही ऑफर ६ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत उपलब्द असल्याने या दरम्यान रिचार्ज केला तरच हा लाभ मिळू शकतो.’फोन पे’ वरून पहिला जिओ रिचार्ज करणार्यांना थेट ७५ रूपयांचा कॅशबॅक मिळेल. मात्र, यापूर्वी ‘फोन पे’ द्वारे रिचार्ज केला असल्यास ३० रुपये कॅशबॅक मिळतील. शिवाय एका फोन पे अकांऊटवरून एकाच रिचार्जवरच ही कॅशबॅक ऑफर मिळेल.

ताज्या बातम्यांसाठी महाराष्ट्र देशाचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.

 

You might also like
Comments
Loading...