fbpx

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, आता आठवडा होणार ५ दिवसांचा

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर भाजप सरकार ने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर दिली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आता आठवडा ५ दिवसांचा असणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राजपत्रित अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामध्ये यापूर्वी दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी असणारी सुटी आता प्रत्येक शनिवारी असेल. ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत हा पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याबद्दल निर्णय घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचं वय ६० करण्यात येणार आहे.

दरम्यान, या बैठकीत निवृत्त कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या महाभाई भत्त्यामध्येही वाढ करण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे मूळ वेतनावर आता ९ टक्क्यांवरून १२ टक्के एवढा महागाई भत्ता देण्यात येणार आहे.