fbpx

बळीराज्यासाठी खुशखबर ! यंदा दुष्काळ नाही…

टीम महाराष्ट्र देशा : सध्या महाराष्ट्रावर दुष्काळाचं सावट असल्याने राज्यातील तमाम शेतकरी बांधव चिंतेत आहे. गेल्यावर्षीच्या कमी पर्जन्यमानामुळे यंदा राज्य दुष्काळाचा सामना करत आहे. मात्र दुष्काळाचा सामना करताना स्कायमेट या खासगी संस्थेचा मान्सूनबद्दलच्या अंदाजामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. यावर्षीचा मान्सून सरासरीइतकाच राहणार आहेत. त्यामुळे दुष्काळाची शक्यता शून्य असल्याच अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे.

स्कायमेट या खासगी संस्थेच्या मान्सूनबद्दलच्या प्राथमिक अंदाजानुसार यावर्षी मान्सून सामान्य राहण्याची शक्यता 50 टक्क्यांहून अधिक आहे. दुष्काळ आणि अतिवर्षा या दोन्हीची शक्यता यावेळी नसल्याचा अंदाज आहे. सरासरीच्या 96 ते 104 टक्के पाऊस हा सामान्य समजला जातो, यावेळी 96 ते 100 टक्के पाऊस राहण्याचा स्कायमेटचा अंदाज आहे. या प्राथमिक अंदाजानंतर पुन्हा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचा अंदाज स्कायमेट देणार आहे. मात्र हा प्राथमिक अंदाज देशभरातल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आहे.