क्रिकेटरसिकांसाठी आनंदाची बातमी, 8 जुलैपासून सुरु होणार कसोटी मालिका

cricket

लंडन- कोरोना व्हायरसमुळे जगभरातील बहुसंख्य देशांमध्ये जनजीवन विस्कळीत झालं. या विषाणूने जगभरात थैमान घातले असल्याने क्रीडा रसिकांची देखील मोठी पंचाईत झाली आहे. मात्र आता क्रिकेट प्रेमी लोकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. मोठ्या विश्रांती नंतर आता पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांना सुरुवात होणार आहे.

इंग्लंड विरुद्ध वेस्टइंडिज मालिकेच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली आहे. इंग्लंडमध्ये होत असलेल्या या मालिकेला 8 जुलैपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेतील सर्व सामने रिकाम्या स्टेडिअममध्ये खेळवण्यात येणार आहेत.

तीन सामन्यांची ही कसोटी मालिका कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या भागात खेळवण्यात येणार आहे. पहिला सामना 8 ते 12 जुलै यादरम्यान साउथॅम्पटन इथं होणार आहे. त्यानंतर दुसरा आणि तिसरा कसोटी सामना अनुक्रमे 16 जुलै ते 20 जुलै आणि 24 जुलै ते 28 जुलै रोजी खेळवण्यात येईल.

धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा,पत्नी साक्षीने सोडले मौन

‘निसर्ग’चं तांडव सुरू; चक्रीवादळाची महाराष्ट्रात धमाकेदार एन्ट्री

‘दाऊदच्या माणसांनी धमक्या दिल्या मात्र न घाबरता आपल्या भुमिकेवर ते ठाम राहीले’