Share

क्रिकेट चाहत्यांसाठी खुशखबर! ‘टी-20 विश्वचषक 2007’ वर लवकरच प्रदर्शित होणार वेब सिरीज

टीम महाराष्ट्र देशा: भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी टी 20 विश्वचषक 2007 हा एक स्मरणीय अनुभव आहे. कारण महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) च्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 मध्ये पहिल्यांदा टी 20 आंतरराष्ट्रीय विश्वचषक आपल्या नावावर केला होता. 2007 मधील हा क्षण प्रत्येक भारतीयाला पुन्हा पुन्हा बघायला नक्कीच आवडेल. तुम्हाला आता हा क्षण केवळ हायलाइट्स मध्ये नाही तर ओटीपी प्लॅटफॉर्मवरही बघता येणार आहे. कारण लवकरच या विश्वचषक सामन्यावर एक डॉक्युमेंटरी वेब सिरीज बनवली जाणार आहे. डॉक्युमेंटरी वेब सिरीज इंटरनॅशनल प्रोडक्शन हाऊसच्या बॅनरखाली चित्रित होणार आहे.

टी 20 विश्वचषक 2007 वर बनवण्यात येणाऱ्या डॉक्युमेंटरी वेब सिरीजचे अद्याप शीर्षक समोर आलेले नाही. मात्र, त्याबद्दलची अधिकृत घोषणा नक्कीच झाली आहे. या वेब सिरीजमध्ये 2007 विश्वचषक स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या पंधरा खेळाडूंची भूमिका साकारण्यात येणार आहे. त्याचबरोबर या सिरीजमध्ये विश्वचषकाचे रियल आणि रील हे दोन्हीही फुटेज वापरण्यात येणार आहे. या वेब सिरीजचा एक तृतीयांश भाग शूट करण्यात आला आहे, अशी माहिती देखील मिळाली आहे.

वन वन सिक्स नेटवर्क ही युके स्थित प्रोडक्शन फर्म टी 20 विश्वचषक 2007 वेब सिरीज निर्मिती करत आहे. ही कंपनी गौरव बहिरवाणी यांची आहे. त्याचबरोबर या सिरीजचे दिग्दर्शन अनंत कुमार करणार आहेत. अनंत कुमार यांनी यापूर्वी दिल्ली हाइट्स आणि जिल्हा गाझियाबाद यासारखे चित्रपट दिग्दर्शित केले आहे. त्याचबरोबर या चित्रपटाची कथा सौरभ एम पांडे यांनी लिहिली आहे. सौरभ एम पांडे यांनी या द काश्मीर फाइल्स, वाणी यासारख्या चित्रपटांची कथा लिहिलेली आहे. या सिरीजमध्ये भारतातील मोठे कलाकार क्रिकेटपटूंच्या भूमिकेत दिसणार असून ही मालिका पुढच्या वर्षाच्या मध्यात प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

टीम महाराष्ट्र देशा: भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी टी 20 विश्वचषक 2007 हा एक स्मरणीय अनुभव आहे. कारण महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) …

पुढे वाचा

Cricket Entertainment Sports