औरंगाबादकरांसाठी सुखावह बातमी; प्रदूषण कमी करण्यासाठी शहराला मिळणार तब्बल ८७ कोटींचा निधी!

औरंगाबादकरांसाठी सुखावह बातमी; प्रदूषण कमी करण्यासाठी शहराला मिळणार तब्बल ८७ कोटींचा निधी!

astik kumar pandey

औरंगाबाद: केंद्र शासनाच्या राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रमांतर्गत औरंगाबाद शहरात स्वच्छ वायूसाठी तसेच प्रदूषणावर आळा घालण्यासाठी पुढील ५ वर्षात टप्प्याटप्प्यात ८७ कोटी मिळणार आहे. मुंबई येथील केंद्र शासनाच्या पर्यावरण, वन आणि वातावरणीय बदल मंत्रालयातर्फे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये औरंगाबाद महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय (Astik kumar pandey) यांनी सहभाग घेत सादरीकरण केले.

मुंबई येथील केंद्र शासनाच्या पर्यावरण, वन आणि वातावरणीय बदल मंत्रालयातर्फे मंगळवारी आणि बुधवारी संवेदनशीलता आणि पुनरावलोकन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत औरंगाबाद महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आणि औरंगाबाद स्मार्ट सिटीचे सीईओ आस्तिक कुमार पाण्डेय यांचा सहभाग होता. या कार्यशाळेसाठी पश्चिम भारतातील गोवा, गुजरात, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातील मोठ्या शहरातील मनपा आयुक्त भाग घेत आहेत. या कार्यशाळेच्या २३ नोव्हेंबरचा सत्रात आस्तिक कुमार पाण्डेय यांनी औरंगाबाद शहराने राबविलेल्या उपक्रमांची माहिती दिली.

औरंगाबाद महानगरपालिकेने या कार्यशाळेत केंद्र सरकार आणि राज्य सरकार सोबत एक करार केला आहे. या करारांतर्गत औरंगाबाद शहरात स्वच्छवायू मिळविण्यासाठी नियमबद्ध पाऊले उचलण्यात येतील. पर्यावरण, वन आणि वातावरणीय बदल मंत्रालय केंद्र शासन, नगर विकास विभाग महाराष्ट्र शासन आणि औरंगाबाद महानगपालिकेमध्ये १५ व्या वित्त आयोगा अंतर्गत हा करार आहे. या करारानुसार औरंगाबाद महानगरपालिकेला पाच वर्षांसाठी ८७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पाच वर्षात टप्प्याटप्प्यात हा निधी महानगरपालिकेला मिळेल.

औरंगाबादेतील प्रकल्पांची माहिती

यामध्ये शहरातील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी राबविण्यात आलेल्या घनकचरा व्यवस्थापनाच्या ३५० टन क्षमता असणाऱ्या तीन प्लांट्सची माहिती देण्यात आली. त्याचबरोबर सार्वजनिक ट्रान्सपोर्ट द्वारे सिटी बस सुरू करून शहरातील वैयक्तिक वाहनांद्वारे होणारे प्रदूषण टाळणे,             बसवणे, रस्त्यावरील धूळ साफ करण्यासाठी स्वीपिंग मशीन, खाम नदी पुनरूज्जीवन, वर्टीकल गार्डन इत्यादी उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती यावेळी आयुक्तांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या