गूड न्यूज ! दोन मुलांनंतर आता एबी डिव्हिलियर्सला लाभले कन्यारत्न

abd

मुंबई : दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्सला भारतामध्ये आजपर्यंत बरच प्रेम मिळालं आहे. आयपीएलमध्ये  एबी डिव्हिलियर्स बंगळुरूकडून खेळत आहे. धोनी आणि कोहलीप्रमाणेच एबीचेही भारतात मोठ्या प्रमाणावर फॅन्स आहेत.

डिव्हिलियर्स आणि त्याची पत्नी डॅनियल यांनी आपल्या मुलीबरोबरचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत. या फोटोखाली डिव्हिलियर्सने लिहिले आहे की, “आमच्या विश्वात एका सुंदर कन्येचे आम्ही स्वागत करत आहोत. आम्ही या कन्येचे नाव येंते ठेवले आहेत. तुम्ही आमच्या कुटुंबांना आशिर्वाद द्या. तुमच्या या शुभेच्छांबद्दल आम्ही आभारी आहोत.” यापूर्वी डिव्हिलियर्सला दोन मुलं आहेत.

त्यानंतर आता डिव्हिलियर्सला मुलगी झाली आहे. डिव्हिलियर्सच्या घरी ११ नोव्हेंबरला पाळणा हलला होता. पण डिव्हिलियर्सने आज आपली पत्नी आणि मुलीबरोबरचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोला चाहत्यांनी चांगलीच पसंती दिली आहे. त्यामुळे हा फोटो चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या