फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील खेळाडूंना सचिनकडून शुभेच्छा

नवी मुंबई : आज पासून सुरु झालेल्या १७ वर्षाखालील फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील सर्व खेळाडूंना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करत रहा कारण स्वप्न नेहमी सत्यात उतरतात, अशा शब्दांत सचिन तेंडुलकर याने खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत. या स्पर्धेसाठी नवी मुंबई सज्ज झाली आहे.

२५ ऑक्टोबरपर्यंत रंगणाऱ्या या स्पर्धेत यजमान शहर म्हणून कोणतीही उणीव राहू नये, म्हणून नवी मुंबई महापालिकेने कंबर कसली आहे. फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे, असा इशारा गुप्तचर यंत्रणेकडून देण्यात आला आहे.

 

 

 

 

You might also like
Comments
Loading...