‘शिवसेना विकासकामे करू शकत नाही फक्त फसवे जाहीरनामे देऊन जनतेची दिशाभूल करते’

uddhav thackeray

संगमेश्वर – उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाले खरे मात्र त्याना सत्तेतल काहीच कळत नाही. ग्रामपंचायत कळत नाही. कोकणात निसर्ग चक्रीवादळ आलं. मात्र मुख्यमंत्र्यांना रत्नागिरी जिल्ह्यात यायला वेळच नाही. शेतकऱ्यांचे भातशेतीचे अतोनात नुकसान झाले पंचनामा करून सुद्धा तुटपुंजी मदत केली आहे. तर काही ठिकाणी अजून मदत देखील मिळाली नाही. शिवसेनेला संपविल्याशिवाय कोकणाला चांगले दिवस येणार नाहीत. सेनेला जास्त महत्त्व देऊ नका. या सेनेने हिंदुत्वाशी गद्दारी केली आहे. अशी जोरदार टीका भाजपचे नेते माजी खासदार निलेश राणे यांनी केली.

ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर संगमेश्वर तालुक्यातील डिंगणी, कडवई, देवरुख-साडवली, साखरपा, बोंडे या गावात गावभेटी घेऊन उमेदवार, प्रतिष्ठित ग्रामस्थ यांना निवडणूक अनुषंगाने मार्गदर्शन व सूचना राणें यांनी दिल्या. तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकला पाहिजे. मतदारांनी मतदान होईपर्यंत गाफील राहू नका असे देखील राणें यांनी सांगितले. यावेळी जिल्ह्यात भेडसावणाऱ्या समस्या ग्रामस्थांनी राणे समोर मांडल्या.

राणे म्हणाले की, उदय सामंत यांच्या मतदारसंघात बघण्यासारख एकही विकासकामे नाहीत. उद्धव ठाकरेंना खुश करण्यासाठी सामंत बोगस काम करतात. विकासकामाच्या बाबतीत एकही सभागृहात चकार शब्द काढला जात नाही. ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेला हाणून पडायच आहे. उमेदवार गावाच्या हिताचं काम करतील. लोकांवर अन्याय होता कामा नये. पंचवीस वर्षे कोकणाने शिवसेनेला भरभरून दिलं मात्र शिवसेनेने जनतेची विकास कामाच्या बाबतीत फसवणूक केली. जिल्हा परिषद दिवाळखोरीत गेली. जिल्हा परिषद मध्ये घोटाळा होतोय. मंत्री पद मिळालं आहे जनसेवा करा. तुमच्या अंगावर कुणी येईल त्याचा जागीच बंदोबस्त करायला निलेश राणे आहे. शिवसेनेच्या धमकीला कुणीही भीक घालायची नाही. तुमचा भाऊ म्हणून निलेश राणे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. कोकणचा आणि गावाचा विकासाच्या हितासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. असे प्रतिपादन त्यांनी केले.

महाराष्ट्रात कुठं वेगळं ओळख सांगायची मला गरज नाही कारण माझं आडनावच राणें आहे. मंत्रालयात व पार्लीमेंट मध्ये खासदार विनायक राऊतला कवडीची किंमत नाही. अंधारात खासदार दिसतच नाही. आताचा खासदार निष्क्रिय आहे. रत्नागिरीचा पालकमंत्री कोण आहे? हे जनतेला देखील माहिती नाही. शिवसेनेचा एक गट त्यांच्या विरोधात आहे. शिवसेना विकासकामे करू शकत नाही फक्त फसवे जाहीरनामा देऊन जनतेची दिशाभूल करतील. कोरोनाच्या काळात ठाकरे सरकारने रत्नागिरी जिल्ह्याला कवडीचीदेखील मदत नाही. जिल्ह्याला जे काही मदत मिळाली ते केंद्र सरकारने दिली. अठाविसाव्या वर्षात मी खासदार झालो. ग्रामपंचायत निवडणूक माझ्यासाठी नवीन नाही. पणवती सरकार आल्याने जनतेला अनेक गंभीर गोष्टींना सामोरे जावं लागत आहे. अशी खरमरीत टीका राणें यांनी केली.

शिवसेनेच्या नेत्याना आता जनता शिव्या घालत आहे. पश्चिम महाराष्ट्रात आठ पदरी रस्ते झाले मात्र रत्नागिरी जिल्ह्यात का नाही चौपदरी रस्ते होत? असा प्रश्न देखील राणें यांनी उपस्थित केला. ते पुढे म्हणाले की,होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेच्या विरोधात लाट निर्माण झाली आहे. विरोधक हा आपला घाव करण्यासाठीच असतो. सर्वांत जास्त शिवसेना रत्नागिरी जिल्ह्यात आहे उर्वरित महाराष्ट्रामध्ये शिवसेना पक्ष दिसतच नाही. आम्ही शिवसेनेत असताना राणें साहेबांनी बाळासाहेब ठाकरेंसाठी जीवाची पर्वा न करता अंगरक्षक म्हणून सेवा केली. कुणीही वाकड्या नजरेने पाहायची हिंमत नव्हती. खरी माणुसकी बाळासाहेब ठाकरे मध्ये होती. उद्धव ठाकरेंनी तर शिवसेना पक्षाच वाटोळं केलं आहे. राज्यात बेरोजगारी वाढली, रत्नागिरीची जिल्हा परिषद दिवाळखोरीत गेली मात्र सेनेचे मंत्री याकडे दुर्लक्ष केले आहे. आपल्याला प्रत्येक निवडणूक जिंकायची आहे. खरी ताकद ग्रामपंचायतीत आहे असे प्रतिपादन राणें यांनी केले.

महत्वाच्या बातम्या