क्रिडा क्षेत्राला अर्थसंकल्पात अच्छे दिन

sport india

आशुतोष मसगौंडे: आज केंद्रिय अर्थमंत्री अरूण जेटलींनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात क्रिडा क्षेत्रासाठी गेल्या वर्षीच्या तुलनेत ३५० कोटींची वाढ करत २०१८ सालासाठी १९३४ कोटींची अर्थिक तरतूद केली. या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी क्रिडा क्षेत्रासाठी केलेली जास्तीची ३५० कोटीची तरतूद येणार्‍या एशियन गेम्स व काँमनवेल्थ गेम्सची तयारी करण्यासाठी भारतीय क्रिडापटूंना नक्कीच फायद्याची ठरणार आहे.

२०१६ ला झालेल्या आँलंपिक स्पर्धेते भारताची कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली होती. या स्पर्धेत भारताच्या वाट्याला फक्त एक रजत व एक कांस्य पदक आले होते. क्रिडा क्षेत्रातील एकूण तरतूदी पैकी स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाला ४८१ कोटी रुपये देण्यात आले आहेत. यामधे सर्वात निराशाजनक बाब म्हणजे गेल्या वर्षी दिव्यांग क्रिडापटूंसाठी जी ४ कोटी रूपयांची अर्थिक तरतूद होती ती यावर्षी १० लाख इतकी कमी करण्यात आली आहे. त्याचबरोबर नँशनल स्पोर्ट्स फेडरेशनला गेल्या वर्षी मिळालेल्या १८५ कोटी रुपयात वाढ करून ती ३०२ कोटी रुपये इतकी करण्यात आली आहे.तसेच नँशनल सर्विस स्किमची अर्थिक तरतूद १३१ कोटींवरूण १४८ कोटी रुपये करण्यात आली आहे.तर राष्ट्रीय खेळ विकास निधि ५ कोटी रुपयांवरून २ कोटी रुपये करण्यात आला आहे.