आयआयटीच्या विद्यार्थांना अच्छे दिन

 टीम महाराष्ट्र देशा : पायाभूत सुविधांसाठी 1 हजार कोटींचा निधी देणार असल्याची घोषणा मुंबई आयआयटीच्या ५६ व्या दीक्षांत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. तसेच भारतातील आयआयटीच्या मुलांचा जगभरात डंका असून त्यामध्ये मुंबईच्या आयआयटीमधील विद्यार्थ्यांचा आहे. त्यामुळेच स्टार्टअप क्षेत्रात भारत जगात दुसऱ्या स्थानावर असल्याचेही मोदींनी म्हटले आहे. तसेच नरेंद्र मोदींच्या दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर, आयआयटीमध्ये कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता. या कार्यक्रमात रमेश वाधवानी यांना मानद डी.एससी. पदवी प्रदान करण्यात आली.

दीक्षान्त समारंभानंतर येथील पर्यावरणीय विज्ञान व अभियांत्रिकी केंद्र, ऊर्जा विज्ञान व अभियांत्रिकी विभागाच्या नव्या इमारतीचे उद्घाटनही मोदींच्या हस्ते झाले. पंतप्रधानांसह दीक्षान्त सोहळ्याला मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर, राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

Loading...

त्यांनी आजच्याच दिवशी खुदीराम बोस हे हुतात्मा झाले असल्याचे सांगत त्यांना आदरांजली अर्पण केली. आयआयटी मुंबईला सहा दशकांची स्वर्णीम परंपरा असल्याबद्दल त्यांनी कौतुक केले. 100 विद्यार्थ्यांपासून सुरू झालेली ही यात्रा आता दहा हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहचल्याचे ते म्हणाले. या आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी जगभरात नावलौकीक मिळवला आहे अश्या पद्धतीने त्यांचे कौतुक पंतप्रधानांंनी केले.

आयआयटीला आता एक हजार कोटी रूपयांचे अनुदान मिळणार असून यातून अजून जास्त पायाभूत सुविधा विद्यार्थ्यांना मिळणार असल्याची माहिती त्यांनी दिली. आयआयटी हा जगभरातील एक अतिशय उज्ज्वल ब्रँड बनला असल्याचे ते म्हणाले. माहिती तंत्रज्ञानामुळे देशात नवीन क्रांती झाली आहे. यात स्टार्टपच्या युगात आयआयटीच्या विद्यार्थ्यांचे सर्वात मोलाचे स्थान असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

आयआयटी मुंबई हे खऱ्या भारताचे प्रतिनिधीत्व करत असल्याची वाखाणणी पंतप्रधानांनी केली. भारतीय समाजाच्या वैविध्याचे येथे दर्शन घडत असल्याचेही यावेळी ते बोलले. 5जी, ब्लॉकचेन तंत्रज्ञान, आर्टीफिशियल इंटिलेजीयन्स, मशीन लर्नींग आदी तंत्रज्ञान येणाऱ्या कालखंडात जगाला बदलून टाकणार असून यात आयआयटीच्या विद्यार्थ्यांचा मोलाचा वाटा राहील. आयआयटी आता इंडिया इन्स्ट्रुमेंट ऑफ ट्रान्सफॉर्मेशन बनले असल्याचे मोदी म्हणाले. या माध्यमातून होणारा बदल हा भारताला प्रगतीपथावर घेऊन जाणार असल्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला. जगभरातील विविध स्टार्टप्समध्ये आयआयटीच्या विद्यार्थ्यांचा वाटा असल्याबद्दल त्यांनी आयआयटीचं कौतुक ही केलं.

पवारांनी माझ्या कॉलरचे अनुकरण केले. हे बास झाले. अजून काय पाहिजे ? : उदयनराजे

 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
अरे तुम्ही काय संरक्षण काढता, पवारांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रातील पैलवान सरसावले
धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
अजित पवारांचे मेहुणे अमरसिंह पाटील यांचं निधन
अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश
मराठा क्रांती मोर्चाचा पहिला बळी ' मी ' ठरलो : आमदार भारत भालके
जातीवाद रोखण्यासाठी शरद पवार मैदानात; सरकार उचलणार 'हे' पाऊल
पवारांना सतावतेय पाकिस्तानातील मुस्लिमांची चिंता,म्हणाले....
रडत राऊतांमुळे यापुढे सामना बंद,बंद,बंद : मनसे
माझं कुणी काहीच ' वाकडं ' करू शकत नाही : संजय राऊत