‘अच्छे दिन तो दिखे नही… एप्रिल फूल बनाया’; मोदींनी दाखवले अच्छे दिनचे गाजर 

टीम महाराष्ट्र देशा – सध्या सोशल मीडियावरून निवडणुकीचा जोरदार प्रचार सुरु आहे. लोकसभा निवडणुकींच्या प्रचाराला वेग आला आहे. तसेच आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या झाडत आहेत. त्यातच विरोधकांकडून अजूनही भाजप सरकारवर जोरदार टीका केली जात आहे, आज १ एप्रिल च्या निमित्ताने मोदींनी सगळ्यांना एप्रिलफूल केले अशी टिळक राष्ट्रवादी कॉग्रेस ने ट्वीटर द्वारे केली आहे.

भाजपने २०१४ च्या निवडणूकीदरम्यान ‘अच्छे दिन’ या मुद्द्यावरून प्रचार केला होता. भाजप सत्तेत आल्यानंतर विरोधकांनी ‘अच्छे दिन’ या शब्दावरून टीका केली. राष्ट्रवादीने ‘This time don’t forget to vote against ‘BURE DIN’.. ‘ या शीर्षकाखाली एक इमेज शेअर केली आहे. इमेजमध्ये एक गाजर दाखवण्यात आले आहे. शिवाय, ‘अच्छे दिन तो दिखे नही, बुरा दिन हर रोज आया… एप्रिल फूल बनाया’ असे म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने भारतीय जनता पक्षावर टीका करताना ट्विटरवरून हा  फोटो शेअर केला आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.  नेटिझन्स या फोटोला चांगलेच ट्रोल केले आहे.