भाजपला ‘अच्छे दिन’ : २०१९-२०मध्ये मिळाल्या काँग्रेसच्या पाच पट देणग्या !

bjp money

मुंबई : २०१४ लोकसभा निवडणुकांपासून भाजपने केंद्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये आपली सत्ता स्थापन केली. सध्या भाजप हा देशातील सर्वात मोठा राष्ट्रीय पक्ष बनला आहे. २०१४ पासून काँग्रेसला लागलेली उतरती कळा ही २०१९ मध्येही कायम राहिली. आणि भाजपने २०१४ हुन अधिक जागा मिळवत च्या मोदी सरकार २.० ची स्थापना केली. भाजपला सत्तेसह आर्थिक स्वरूपात देखील मोठा फायदा झाला आहे.

देशातील अनेक पक्ष हे पक्षासाठी निधी जमा करतात. यासाठी सामान्य जनता, कंपन्या, संघटना, संस्था यांच्याकडून देणग्या स्वीकारल्या जातात. भाजप सध्या सत्तेच्या आकड्यांसह देणग्यांच्या आकडेवारीत देखील अग्रेसर असल्याचं दिसून येतंय. गेल्या काही वर्षांमध्ये भाजपला मिळणाऱ्या देणग्यांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. सलग सातव्या वर्षी भाजपने सर्वाधिक देणग्या मिळण्यात अग्रेसर स्थान कायम ठेवलं आहे.

२०१९-२० मधील देणग्यांच्या माहितीनुसार भाजपला आलेल्या देणग्यांची रक्कम ही जवळपास काँग्रेसच्या पाच पट आहे. २०१९-२० या वर्षात भाजपला तब्बल ७५० कोटी रुपयांची रक्कम देणगी मिळाली आहे. तर, याच काळात काँग्रेसला १३९ कोटी रुपये इतकी रक्कम देणगी म्हणून मिळाली आहे. राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाकडे यासंदर्भात सादर केलेल्या अहवालातील आकडेवारीवरून ही माहिती समोर आली आहे.

जाणून घ्या कोणत्या पक्षाला मिळाली किती देणगी !

देशात सर्वाधिक ७५० कोटी रुपयांची देणगी भाजपाला मिळाली असून याच काळात काँग्रेसला १३९ कोटी, राष्ट्रवादी काँग्रेसला ५९ कोटी, तृणमूल काँग्रेसला ८ कोटी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीला १९.६ कोटी आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टीला १.९ कोटी इकक्या रकमेच्या देणग्या मिळाल्या आहेत. ही आकडेवारी देशातील राष्ट्रीय पक्षांना मिळालेल्या देणग्यांची आहे. यासंदर्भात द इंडियन एक्स्प्रेसने वृत्त दिले आहे. दरम्यान, भाजपची आकडेवारी ही याहून अधिकही असू शकते. याबाबत ऑडिट निवडणूक आयोगाला सादर करण्याची मुदर ३० जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या