fbpx

राष्ट्रवादीकडून भंडारा – गोंदिया पोटनिवडणुकीसाठी ‘हे’ असणार उमेदवार

Congress-NCP alliance for Sangli municipality possible?

गोंदिया – भाजपचे बंडखोर खासदार नाना पटोले यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिल्यानं भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात पोटनिवडणूक होणार आहे.

दरम्यान ही पोटनिवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस लढवण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी त्यांनी आपला उमेदवारही निश्चित केला आहे. या पोटनिवडणुसाठी माजी आमदार मधुकर कुकडे हे राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार असणार आहेत. ते आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीत उमेदवार निश्चितीसाठी काल (बुधवार) प्रफुल्ल पटेलांच्या उपस्थितीत बैठक पार पडली होती. त्यावेळी राष्ट्रवादीकडून विजय शिवनरकर यांचंही नाव चर्चेत होतं. पण अखेर मधुकर कुकडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.

दरम्यान, भाजपकडून हेमंत पटेल हे उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यामुळे आता या जागी नेमकं कोण बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.