पुण्यातील सारसबागेसमोरील महालक्ष्मी देवीला सोन्याची साडी

गेल्या सात वर्षापासून सुरु आहे हि परंपरा

पुणे:सारसबाग परिसरातील महालक्ष्मीला विजयादशमीच्या मुहूर्तावर सोन्याची साडी नेसवण्यात आली आहे. यावेळी भाविकांनी महालक्ष्मीचे सोज्वळ, देखणे रुप पाहण्यासाठी मंदिरात गर्दी केली होती.

आज देशभरात विजयादशमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे . पुण्यात देखील या सणाचा मोठा उत्साह पहायला मिळत आहे . सारसबागेतील महालक्ष्मी मंदिरातील देवीला गेल्या सात वर्षापासून ही सोन्याची साडी नेसविण्यात येते. तसेच दसरा आणि लक्ष्मीपूजेच्या दिवशी महालक्ष्मीला सोन्याची साडी नेसवून पूजा केली जाते. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील देवीच्या मंदिराला आकर्षक फुलांनी सजवण्यात आले.अनेक वर्षे जुन्या परंपरानुसार या महालक्ष्मी मंदिरात दरवर्षी नवरात्रीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.

You might also like
Comments
Loading...