मुंबईतील ‘या’ बँकमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी; जाणून घ्या

बँक

मुंबई : बँकेमध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या तरूणासाठी आता म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक मुंबईमध्ये नोकरीची सुवर्णसंधी घेऊन येत आहे. लवकरच काही पदांसाठी येथे भरती होणार आहे. याठिकाणी विविध पदाच्या जागा भरण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करावा लागणार आहे.

म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँकेत उपमहाव्यवस्थापक, सहाय्यक महाव्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक या पदांसाठी ही भरती असणार आहे. या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2021 असणार आहे.  या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://municipalbankmumbai.com/career.php या लिंकवर क्लिक करा.

पात्रता आणि अनुभव

उपमहाव्यवस्थापक- कॉमर्समध्ये पदवी आवश्यक. सहाय्यक महाव्यवस्थापक – MBA किंवा CA पदवी आवश्यक. सहाय्यक महाव्यवस्थापक – कॉमर्समध्ये पदव्युत्तर पदवी वरिष्ठ व्यवस्थापक – कॉमर्समध्ये पदव्युत्तर पदवी सहाय्यक व्यवस्थापक- कॉमर्समध्ये पदव्युत्तर पदवी उमेदवाराकडे असणे अपेक्षित आहे. याबाबत अधिक माहितीसाठी बँकेच्या वेबसाईटला भेट द्या.

महत्वाच्या बातम्या :