पहिल्यावहिल्या T-२० विश्वचषकाच्या भारत-पाकिस्तान अंतिम सामन्याचा सुवर्णदिवस!

t-20 2007

दिग्विजय दीक्षित, पुणे : आजच्याच दिवशी १३ वर्षांपूर्वी २४ सप्टेंबरचा दिवस उगवला तो भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी एक मोठा आशेचा किरण घेऊन….!! क्रिकेटच्या इतिहासात सुरू झालेल्या पहिल्यावहिल्या T-२० विश्वचषकातील अंतिम सामना आणि तो सुद्धा भारत विरुद्ध पाकिस्तान. भारत-पाकिस्तान विश्वचषकातील कोणत्याही सामन्यात आजवर पाकिस्तान भारताला पराभूत करू शकलेला नव्हता.

भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना १५७ धावांची आव्हानात्मक धावसंख्या उभारली कारण तत्पूर्वी झालेल्या साखळी सामन्यात भारतीय संघाने त्याच पाकिस्तान संघाला केवळ १४१ धावा करूनही बॉलआऊट प्रकारात पराभवाची धूळ चारली होती. यामध्ये स्टार खेळाडू गौतम गंभीरच्या ५४ चेंडूत ७५ आणि त्याकाळी संघात नुकताच पदार्पण रोहित शर्माच्या १६ चेंडूत ३० धावांच्या बळावर भारताने ही धावसंख्या उभारली.

जेव्हा भारताने गोलंदाजीची सुरवात केली तेव्हा नवोदीत असलेल्या इरफान पठाण या खेळाडूने ४ षटकात फक्त १६ धावा देत पाकिस्तानच्या ३ खेळाडूंना बाद केले. यामध्ये शोएब मलिक, धुव्वाधार फलंदाज शाहिद आफ्रिदी आणि यासीर अराफत यांचा समावेश होता. यानंतर इरफानला सामनावीरचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

एखाद्या विश्वचषकातील अंतिम सामन्यात सामनाविराचा पुरस्कार मिळवणे म्हणजे त्या खेळाडूसाठी सर्वोच्च सन्मान असल्यासारखेच आहे, परंतु यानंतर हा खेळाडू तितकासा प्रकाश झोतात आला नाही. तर आजच्या २४ सप्टेंबरच्या निमित्ताने या खेळाडूची ही एक छोटीशी आठवण….!

महत्वाच्या बातम्या :