सरकारची आता तुमच्या सोन्यावर नजर

आयकर विभाग

बेहिशेबी मालमत्तेनंतर सरकारची आता तुमच्याकडे असणाऱ्या सोन्यावर नजर असणार आहे. मात्र, आधीच करभरलेल्या उत्पानातून किंवा त्यांच्या घरगुतीतल बचतीतून घेतलेल्या सोन्या -चांदीच्या दागिन्यांची जप्ती करण्याचा सरकारचा कोणताच विचार नाही असे आयकर विभागानं आज स्पष्ट केले आहे. विवाहित महिलांना ५० तोळे सोने बाळगता येणार आहे. तर अविवाहित महिलांना २५ तोळे, तर पुरुषांना केवळ १० तोळे सोने बाळगता येणार आहे. त्यापेक्षा जास्त सोने आढळल्यास आयकर विभागाच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.