Share

Gold Silver Price Update | या सणासुदींच्या दिवसांमध्ये सोन्याच्या खरेदीपेक्षा चांदीच्या खरेदीत वाढ, जाणून घ्या 24 कॅरेट सोन्याचे भाव

टीम महाराष्ट्र देशा: आज 14 ऑक्टोबर 2022 रोजी जागतिक संकेतांमुळे भारतीय फ्युचर मार्केटमध्ये एकीकडे सोन्याची किंमत घसरली आहे. तर, दुसरीकडे चांदीच्या दरात तेजी दिसत आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारातही आज सोन्या-चांदीची दर खाली घसरले आहे. मल्टी कमोडीटी एक्सचेंज (MCX) वर, आज शुक्रवारी (14 ऑक्टोबर 2022) बाजारात सोन्याची किंमत 0.13 टक्क्यांनी घसरली असून चांदीचा दर 0.11 टक्क्यांनी वाढला आहे.

आज (14 ऑक्टोबर 2022) वायदे बाजारात सकाळी 9.10 वाजता 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव 65 रुपयांनी घसरून प्रति 10 ग्रॅम 50,819 रुपये झाला आहे. आज बाजारामध्ये सोन्याचा भाव 50,794 रुपये आहे. एकटी कमोडिटी एक्सचेंज मध्ये आज चांदीच्या किमतीत क्वचित वाढ झाली आहे. चांदीचा दर आज 61 रुपयांनी वाढला असून चांदीची किंमत आता 57,201 रुपये झाली आहे. आज बाजारात चांदीचा व्यवहार 57,226 कृपया पासून सुरू झाला आहे.

13 ऑक्टोबर 2022 रोजी आंतरराष्ट्रीय बाजारात झालेली सोन्याच्या किमतीत झालेली वाढ आज घसरली आहे. सोन्याचा स्पॉट भाव आज 0.45 टक्क्यांनी घसरून $1,667.13 प्रति औस झाला आहे. काल सोन्याच्या भाव 0.32 टक्क्यांनी वाढला होता. गेल्या अनेक दिवसाच्या घसरणीनंतर गुरुवारी सोन्याचे भाव सावरले होते.

भारतीय सराफा बाजारात गुरुवारी सोन्याच्या किमतीत क्वचित वाढ झाली होती. दिल्लीमध्ये सराफ बाजारात सोन्याचा दर 42 रुपयांनी वाढला होता तर चांदीचा दर 493 रुपयांनी घसरला होता. गुरुवारी सोन्याचा भाव 42 रुपयांनी वाढल्यामुळे 51,213 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले होते. त्याचवेळी चांदीचा भाव 493 रुपयांनी घसरून 57,717 रुपये प्रति किलो झाला.

महत्वाच्या बातम्या 

टीम महाराष्ट्र देशा: आज 14 ऑक्टोबर 2022 रोजी जागतिक संकेतांमुळे भारतीय फ्युचर मार्केटमध्ये एकीकडे सोन्याची किंमत घसरली आहे. तर, दुसरीकडे …

पुढे वाचा

Diwali Artical

Join WhatsApp

Join Now