रिक्षात विसरलेले १० तोळे दागिने परत मिळाले

सोलापूर : नातेवाईकाच्या लग्नासाठी २५ जानेवारी रोजी दुपारी ठाणे येथील एक दांपत्य सोलापुरात अाले. शिवाजी चौकातून रिक्षा घेऊन कुमठा नाका भागात गेल्यानंतर दागिन्यांची पिशवी विसरल्याचे लक्षात अाले. पोलिसांना माहिती दिल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने तपास चक्रे फिरवली.

bagdure

शिवाजी चौकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रिक्षात बसतानाची छबी कैद झाली होती. त्या अाधारे तपास करून पोलिसांनी दहा तोळे दागिने अवघ्या काही तासात शोधले. चंद्रभागा व वामन खरात (वय ६५, रा. ठाणे) यांच्यावर हा प्रसंग अाला होता. कुमठा नाका येथे जाण्यासाठी शिवाजी चौक ते सम्राट चौक मार्गावरून रिक्षा पकडून विवाहस्थळी अाले.

काही वेळाने बॅग नसल्याचे लक्षात आले. शोधल्यानंतर पिशवी मिळाली नाही. सदर बझार व गुन्हे शाखेला माहिती देण्यात अाली. फौजदार भीमसेन जाधव यांनी शिवाजी चौकातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केल्यानंतर खरात हे रिक्षात बसताना चित्रीकरण झाल्याचे दिसले. रिक्षा नंबर एमएच १३ जी ७२ एवढाच क्रमांक अाला होता. अारटीअोतून वाहनाची माहिती काढल्यानंतर ती रिक्षा भवानी पेठेतील मड्डीवस्तीत असल्याचे समजले.

Comments
Loading...