सुवर्णपदकाची आशा मावळली ; महिला हॉकी संघाचा सेमी फायनलमध्ये पराभव

hocky

नवी दिल्ली : ऑलिम्पिक इतिहासात पहिल्यांदाच सेमी फायनलमध्ये प्रवेश करत भारताच्या महिलांच्या हॉकी टीमनं इतिहास रचला होता. परंतु आता भारताच्या महिला हॉकी संघाला आज झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात चमकदार कामगिरी करूनही अर्जेंटिनाकडून संघाकडून 2-1 ने पराभूत व्हावे लागले आहे. या सामन्यात संघाने चांगली कामगिरी केली, पण विजय मिळवू शकला नाही. या ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाने उपांत्य फेरीत प्रवेश करून इतिहास रचला होता. भारत आता ब्रॅांझ पदकासाठी खेळणार आहे.

खरतर ‘हार कर जितने वाले को बाजीगर केहते हे!’ या प्रसिद्ध सिनेमा डायलॉगला साजेसा खेळ महिला हॉकी संघाने टोक्यो ऑलिम्पकमध्ये केला आहे असे म्हणले तर वावगे ठरणार नाही. सुरुवातीला सलग तीन सामने गमावल्यानंतर एखाद्या घायाळ वाघिनीप्रमाणे भारतीय महिलांनी स्पर्धेत पुनरागमन केले. ग्रुपस्टेजमधून उपांत्यूपूर्व फेरीत येत त्याठिकाणी ऑस्ट्रेलियासारख्या तगड्या प्रतिस्पर्धी संघाला धूळ चारत सेमीफायनल गाठली. त्यानंतर सेमीफायनलमध्येही अगदी तगडी टक्कर दिली पण अवघ्या एका गोलच्या फरकाने भारतीय महिला पराभूत झाल्या. ज्यामुळे सुवर्णपदकाचे त्यांचे स्वप्न तुटले आहे.

भारतीय महिला टीमनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा 1-0 ने पराभव करत सेमी फायनलमध्ये धडक मारली होती. ऑलिम्पिक स्पर्धेत तीन वेळा गोल्ड मेडल जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा पराभव करत भारतानं इतिहास रचला होता. त्यापूर्वी साखळी सामन्यात पहिले तीन सामने सलग पराभूत झाल्यानंतर भारतीय टीमनं जोरदार कमबॅक केलं. आधी आयर्लंड आणि नंतर दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत भारतीय महिलांनी क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला होता.

महत्त्वाच्या बातम्या