उत्तर प्रदेशमध्ये तब्बल ३ हजार ३५० टन सोन्याचा खजिना सापडला

टीम महाराष्ट्र देशा  – उत्तर प्रदेशमध्ये गरीब असलेल्या सोनभद्र जिल्ह्यात तब्बल 3 हजार ३५० टन सोन्याचा खजिना सापडल्याची बातमी आहे. लवकरच या सोन्याचा लिलाव होणार असून यासाठी सरकारतर्फे सात सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे.

गरीब असलेला हा सोनभद्र जिल्हा लवकरच सोन्याची खाण सापडल्याने श्रीमंत होणार आहे. उत्तर प्रदेशातील सोनभद्र या जिल्ह्यातील सोन पहाडी नजीक जियोलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया (जीएसआय), उत्तर प्रदेश डायरेक्टरी ऑफ जिऑलॉजि आणि उत्खनन तज्ज्ञांनी दोन ठिकाणी सोन्याच्या खाणी शोधल्या आहेत. याआधी अनेकदा सोनभद्र हा जिल्हा नक्षलवादी घडामोडींनी चर्चेत होता.

Loading...

सोनभद्रच्या कोन तालुक्यातील हरदी आणि दुध्धी तालुक्यातील महुली या दोन गावातील डोंगराळ प्रदेशात सोनं सापडलं आहे. हरदी येथे तब्बल ६४६.१५ किलो इतकं तर महुली येथे २९४३.२५ किलो इतकं सोनं सापडलं आहे. या सोन्याचा ई-निविदा मागवून लिलाव केला जाणार आहे. यासाठी क्षेत्राचं टॅगिंग करणं गरजेचं असल्याने सात सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे.

सरकारने गोल्ड डिपॉझिट उत्खननासाठी भाडे तत्वावर देण्याचे ठरवले आहे. सोन्याच्या खाणी सोनपहाडी आणि हरदी येथे सापडल्या आहेत. जीएसआयने वर्तवलेल्या अंदाजानुसार सोनपहाडी येथे २७०० मिलियन टन आणि हरदी येथे ६५० मिलियन टन सोनं असण्याची शक्यता आहे अशी माहिती जिल्हा मायनिंग अधिकारी के. के. राय यांनी दिली.

तसेच सोनभद्रमध्ये युरेनियमचेही साठे असण्याची शक्यता आहे. त्याच्याही शोधार्थ उत्खनन सुरू आहे.

हेही पहा –

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
रुग्णालयाची अवस्था पाहून तुकाराम मुंढेंचा संताप; जमत नसेल तर घरी जा...
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
निलंग्यातील मज्जीदमधून १२ परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात !
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
...त्यामुळे भारताला कोरोनापासून अमेरिके इतका धोका नाही, या तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले मत
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
माझं शरीर आहे, माझी मर्जी मी माझ्या शरीरासोबत तेच करेन ! जे मला योग्य वाटतं
कोरोना व्हायरस संदर्भात भारतीय शास्त्रज्ञांना मोठं यश