राम मंदिरासाठी न्यायालयात जाणं म्हणजे मूर्खपणा- संभाजी भिडे

SAMBHAJI-BHIDE-GURUJI

नंदुरबार: कोरेगाव-भीमा दंगलीप्रकरणी गंभीर आरोप असलेले मनोहर भिडे उर्फ संभाजी भिडे यांनी राम मंदिरावर विधान केले आहे. राम मंदिरासाठी न्यायालयात जाणं हा मूर्खपणा आहे, कोण न्यायाधीश आणि हा सर्व नालायकपणा कशासाठी?, असा खडा सवाल त्यांनी उपस्थित केला.

झी२४ तासनी दिलेल्या वृत्तानुसार संभाजी भिडे गुरुजी यांच्या उपस्थितीमध्ये नंदुरबार शहरातील श्रॉफ हायस्कुल मध्ये आयोजीत सभेदरम्यान भिडे गुरुजी बोलत होते. सुवर्ण सिहांसन पुनर्स्थापना संकल्प पूर्तता आवाहनासाठी त्यांनी नंदुरबार मध्ये ही सभा घेतली. संभाजी भिडे म्हणाले, राम मंदिरासाठी न्यायालयात जाणं हा मूर्खपणा आहे. कोण न्यायाधीश आणि हा नालायकपणा कशासाठी?

रायगडावर संभाजी महाराजांचाही पुतळा स्थापन करणार

संभाजी भिडे यांनी रायगडावर संभाजी महाराजांचाही पुतळा स्थापन करणार असल्याची घोषणा केली. तसेच रायगडावर उभारल्या जाणाऱ्या ३२ मण सुवर्ण सिंहासनासाठी सरकारची एक दमडीही घेणार नसल्याचं त्यांनी सांगितले.