अपघातामध्ये एक व्यक्ती जाणे म्हणजे त्या कुटुंबातील लोकांवर त्याचा परिणाम – घनश्याम सोनवणे

औरंगाबाद : एस.टी. महामंडळाचे सजक आणि प्रशिक्षीत चालक आणि वाहक यांच्या मुळे लोकांचा दैनदिन प्रवास सुखकर होत असून एस.टी. चे अपघात देखील कमी प्रमाणत असल्यामुळे लोकांचा एस.टी. महामंडळावर विश्वास आहे. अपघातामध्ये एक व्यक्ती जाणे म्हणजे त्या कुटुंबातील लोकांवर त्याचा परिणाम होतो. आपण ज्यावेळी घराच्या बाहेर पडतो त्यावेळी घरातील व्यक्ती आपली घरी येण्याची वाट पाहत असतात’, याचे भान ठेवुन प्रत्येकाने वाहतूक शिस्तीचे आणि नियमांचे पालन करुन चालकाने वाहन चालविणे गरजेचे असल्याचे सपोनि घनश्याम सोनवणे म्हणाले. एस.टी. महामंडळ, औरंगाबाद आगार क्रमांक 1 सिडको येथे सुरक्षिता मोहीमीचे उदघाटन सोहळा झाला. या प्रसंगी ते बोलत होते.

महामंडळा मध्ये ‘अच्छे काम करणे वाले को सन्मान और बुरा काम करणे वालो को सजा’ या धोरणामुळे दुसऱ्या चालकांना देखील शिकायला मिळत असल्याचे ते म्हणाले. सुरक्षा अभियान राबवून जणजागृती करत नव तुरुणांनी याबाबत जबाबदारी बाळगणे व त्यासाठी त्यांचे प्रबोधन करणे अंत्यत आवश्यक आहे. त्याच बरोबर चालकाने गाडी चालवतांना सीट बेल्ट लावणे, तसेच एकाग्रता असणे, डोक्यात कोणताही विचार न ठेवणे तसेच बस मध्ये 45 कुटुंबाचे पालण करण्याचे भान ठेवुन कर्तव्य पार पाडले पाहिजे.

नागरीकांनी सुरक्षतेच्या दृष्टीने एस.टी.चा प्रवास सुरक्षित प्रवास आहे त्यामुळे जास्तीत जास्त नागरीकांना एस.टी.ने प्रवास करावे असे आवाहन सोनवणे यांनी केले. या वेळी अमोल अहिरे, अमोल भुसारे, साहेबराव कसबे यांची उपस्थीती होती.

महत्वाच्या बातम्या