जर माझ्या नावापुढे ‘गांधी’ आडनाव नसतं तर मी दोनवेळा खासदार नसतो-वरुण गांधी

टीम महाराष्ट्र देशा: मी आज हैदराबादमध्ये आलो आणि तुम्ही मला ऐकता आहात. मात्र जर माझ्या नावापुढे गांधी आडनाव नसतं आणि मी दोनवेळा खासदार नसतो तर तुम्ही मला ऐकायला आला नसता अस वक्तव्य भाजपचे खासदार वरुण गांधींनी केलं आहे. तसंच गॉडफादरशिवाय राजकारणात पाय रोवणं कठीण असल्याचंही वरुण गांधी म्हणाले. ते हैदराबादेतील एका कार्यशाळेत बोलत होते.

मध्यंतरी वरुण गांधी काँग्रसमध्ये जाणार असल्याच्या वावड्या उठल्या होत्या पण वरुण गांधींनी या बातम्यांचे खंडन केले होते. मात्र वरुण गांधींच्या आजच्या वक्तव्याने त्याचा कॉंग्रसशी घरोबा होण्याच्या चर्चांना वेग आला आहे.