देवतारी त्याला कोण मारी! नदीत वाहून गेलेले दोघे सुखरूप निघाले बाहेर

औरंगाबाद : फुलंब्री शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावल्याने बुधवारी सायंकाळी तालुक्यातील पानवाडी कडून फुलंब्रीच्या दिशेने येत असताना दोन जण पाण्यात दुचाकीसह वाहून गेले. पण सुदैवाने ते दोघे जण नदीतून बाहेर सुखरूप आले आहे. मात्र या दोघांची रात्री उशिरा पर्यंत ओळख पटली नाही.

याबाबत अधिक माहिती अशी की, फुलंब्री शहरातून परिसरातुन फुलमस्ता नदी वाहते. बुधवारी चार वाजता पावासाने जोरदार हजेरी लावली. यामुळे नदीला पूर आला होता. फुलंब्री शहरातून पानवाडीकडे जाण्यासाठी फुलमस्ता नादिवर असलेल्या पुलाची उंची कमी असल्याने या पुलावरून सायंकाळच्या सुमारास पावसाचे पाणी वाहत होते.

त्याचवेळी पानवाडीकडून फुलंब्री शहराच्या दिशेने एका दुचाकीवर दोन जण येत होते. पावसाच्या पाण्याचा प्रवाह वाढल्याने दोघेही जण दुचाकीसह नदीत वाहून केले. मात्र देव तारी त्याला कोण मारी. या उक्तीप्रमाणे दोघेही जण नदीच्या कडेला जाऊन पाण्याच्या बाहेर निघाले. मात्र दुचाकी पाण्यात वाहून गेली आहे. या दोघांची अद्याप पर्यंत ओळख पटली नव्हती. त्यामुळे या पुलाची उंची वाढविण्यात यावी अशी मागणी होऊ लागली आहे.

महत्वाच्या बातम्या 

IMP