#होरपळतोय_महाराष्ट्र : गोदावरी आटली, पाण्याआभावी माशांची तडफड सुरू

टीम महाराष्ट्र देशा- राज्यभरात सध्या भीषण दुष्काळ पडल्याचे चित्र आहे. भीषण पाणीटंचाईला तोंड देत आहेत असे असले तरीही पाणीटंचाईवर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी प्रशासन, सामाजिक संस्था अथवा लोकप्रतिनिधींकडून सध्यातरी कोणतेही पाऊल उचलले जात नसल्याचे समोर येत आहे.

Loading...

नागावातून वाहणारी गोदावरी नदी पूर्णपणे कोरडी पडली असून या कोरड्या नदीत पाण्याअभावी माशांची तडफड सुरू असल्याचं हृदयद्रावक चित्र पहायला मिळत आहे. एएनआयनं नुकतेच काही फोटो ट्विट केले आहेत. या फोटोंमधून दुष्काळाची दाहकता आणि भीषणता आपल्याला दिसून येतेय.

एनआयएने ट्विट केलेले फोटो औरंगाबाद जिल्ह्याच्या पैठण तालुक्यातील नागांवातील आहेत. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, परिसरात गोदावरी नदी एकदम कोरडी पडली असून माणसं आणि जनावरांसाठीही पाणी उरलेलं नाही. स्थानिकांच्या मते, अजूनपर्यंत त्यांना सरकारकडून कोणतीही मदत मिळालेली नाहीये.Loading…


Loading…

Loading...