आचरेकर सरांना अखेरचा निरोप देताना ‘क्रिकेटचा देव’ ढसाढसा रडला

मुंबई : भारताला ‘क्रिकेटचा देव’ देणारे प्रशिक्षक रमांकात आचरेकर यांच्यावर शिवाजी पार्क येथील भागोजी कीर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. खेळाबरोबरच जगायला शिकवणाऱ्या लाडक्या सरांना निरोप देताना सचिनला अश्रू अनावर झाले होते.

गेल्या अनेक दिवसांपासून ते अत्यवस्थ होते. त्यांच्या जाण्यानं क्रिकेट विश्वात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. क्रिकेट क्षेत्रातील विविध मान्यवरांनी आचरेकर सरांना निरोप देण्यासाठी गर्दी केली होती. वयाच्या 87 व्या वर्षी वृद्धापकाळामुळे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.