‘देवा त्यांना सद्बुद्धी दे’; बबितानंतर टप्पूने शेअर केलेली पोस्ट चर्चेत

raj adanakat

मुंबई : गेली तेरा वर्षांपासून लोकांचं मनोरंजन करणारा टीव्ही शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’. या शोबद्दल सतत काही ना काही चर्चा सुरू असतात. सध्या या शोमधील बबिता आणि टप्पू म्हणजे राज अनादकत यांची रियल लाईफमध्ये एकमेकांना डेट करत असल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल होत होती. मुनमुन दत्तापेक्षा तो तब्बल नऊवर्ष लहान आहे. यावरून या दोघांना प्रचंड ट्रोल करण्यात आले. मात्र यावर आता बबिता अर्थात मुनमून दत्ताने संताप व्यक्त केला आहे. त्यानंतर आता राजने देखील एक पोस्ट शेअर केली आहे.

राजने ही पोस्ट त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केली आहे. ‘माझ्याबद्दल माझ्या संमतीशिवाय सातत्याने लिहित असलेल्या प्रत्येकाला, तुमच्या या सगळ्या कथांमुळे माझ्या आयुष्यावर काय परिणाम होऊ शकतो याचा विचार करा. अशा सगळ्या बातम्या लिहिणाऱ्या सगळ्यांनी तुमच्यात असलेली ही सर्जनशीलता इतर गोष्टींमध्ये वापरा, त्याच्याने नक्कीच तुम्हाला फायदा होईल. देवा त्यांना सद्बुद्धी दे,’ अशा आशयाची पोस्ट राजने शेअर केली आहे.

दरम्यान, बऱ्याच काळापासून राज आणि मुनमुन दत्ताच्या इन्स्टाग्राम पोस्ट आणि कमेंट याकडे लक्ष वेधत होत्या. सोशल मीडिया नेटकऱ्यांना अनेकदा मुनमुनच्या फोटोंवर राज यांच्या प्रतिक्रिया दिसल्या. तसेच ते दोघेही चांगल्या मित्रांपेक्षा जवळ आहे. अशा एकंदरीत मोठ्या अफवा पसरवण्यात आल्या होत्या आणि यावरून त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोलींंगचा सामना करावा लागला होता.

महत्त्वाच्या बातम्या