शेळी,गांडूळ,ससा, होईल! पण धरणात लघुशंका करणारा अजित पवार नाही: उद्धव ठाकरे

 धरणात लघुशंका करणाऱ्या अजित पवारांना कालवा आणि धरणाच्या आजूबाजूला फिरकू देऊ नका

जालना : शिवसेनेच्या वाघाची शेळी,गांडूळ आणि आता कासव झाला असून शिवसेना आता मान आत घालून बसली आहे. त्यामुळे शिवसेना आता काहीच करु शकत नाही, अशी टीका अजित पवारांनी हल्लाबोल मोर्चाच्या समारोपावेळी औरंगाबादमध्ये केली होती. दरम्यान शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांच्या टीकेला सडेतोड उत्तर दिल आहे.

मी शेळी,गांडूळ ,ससा,कासव व्हायला तयार आहे मात्र धरणात लघुशंका करणारा अजित पवार व्हायला तयार नाही, तसंच धरणात लघुशंका करणाऱ्या अजित पवारांना कालवा आणि धरणाच्या आजूबाजूला फिरकू देऊ नका अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांना उत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे जालना जिल्ह्यातील घनसावंगीमध्ये शेतकरी मेळाव्यात बोलत होते. त्यांनी भाजप सह राष्ट्रवादी काँग्रेसचा चांगलाच समाचार घेतला. २०१९ नंतर भाजप सत्तेत राहणार नाही असंही त्यांनी सांगितल. तसेच शिवसेना आगामी निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचं पुन्हां एकदा स्पष्ट केलं.

You might also like
Comments
Loading...