‘बोकड बांधा लागते, मसाले आणा लागते, गावात तेव्हा लोक ‘मतदान’ करतात’ : बच्चू कडू

blank

टीम महाराष्ट्र देशा : आधी ‘बोकड बांधा लागते, मसाले आणा लागते, गावात तेव्हा लोक मतदान करतात’,असे वक्तव्य करून प्रहार संघटनेचे प्रमुख आणि विद्यमान जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतली आहे.

बच्चू कडू हे विदर्भ विद्यार्थी परिषदेत बोलत होते.कडू पुढे पुढे म्हणाले की ‘माझा कुणी नेता नाही, माझा नेता दिल्लीत नाही. मी कुणा नेत्याचा गुलाम नाही. मी जनतेचा गुलाम आहे. राजकारणात जात धर्म बघितले जातात. जात सांगता आली पाहिजे. झेंड्याचा रंग पांढरा असेल तर कुणी मतदान करत नाही. ७५ ते ८० टक्के लोक जात पाहून मतदान करतात. त्यामुळे या देशाचं वाटोळं झालं. सेवा करुन मतदान मिळत नाही. झेंड्याचा रंग पाहून मतदार मतदान करतात.

आजकाल निवडणुकीच्या प्रचाराला हीरो आणि हीरोईन आणावी लागते. मला पण निवडणुकीच्या वेळी माझ्या प्रचाराला ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना बोलवा, असे कार्यकर्ते म्हणत होते. मी या राजकारणाला फाटा दिला नाही तर बोकड बांधा लागते, मसाले आणा लागते, गावात तेव्हा लोक मतदान करतात, अशी वस्तूस्थिती त्यांनी विद्यार्थी परिषदेच्या कार्यक्रमात मांडली.

मी पक्षाचा असतो तर शरद पवार, सोनीया गांधी, उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांची सभा घेतली असती तर तुम्ही निवडूण दिलं असतं पण मला कुणी नेता नाही, असेही बच्चू कडू यांनी यावेळी सांगितले. बच्चू भाऊंनी अशा आशयाचं वक्तव्य करून कार्यक्रमात सध्याची सत्य परिस्थिती सांगितली.