गोव्यातील मंत्रिमंडळाचा झाला विस्तार, तर आयात कवळेकर उपमुख्यमंत्रीपदी

टीम महाराष्ट्र देशा : गोव्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी या नवीन मंत्र्यांना शपथ दिली आहे. या शपथ विधिवेळी कॉंग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या १० आमदारांपैकी तीन आमदारांना कॅबिनेटमध्ये स्थान मिळाले आहे. तर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आपल्या मंत्रीमाडळात चार नवीन मंत्र्यांचा समावेश केला आहे. विरोधी पक्षाचे माजी नेते चंद्रकांत कवळेकर यांना उपमुख्यमंत्री म्हणून शपथ देण्यात आली आहे.

तर आज झालेल्या शपथविधीमध्ये भाजपामध्ये प्रवेश करणारे बाबू कवळेकर, फिलीप नेरी, जेनिफर मोन्सेरात यांच्यासह मायकल लोबो यांनी आज शपथ घेतली. काँग्रेसचे दहा आमदार भाजपमध्ये दाखल झाल्याने भाजपचे संख्याबळ 27 झाले. त्यामुळे गोवा फॉरवर्डचे तिघे आणि अपक्ष खंवटे या चौघा मंत्र्यांना डच्चू द्यावा असा निर्णय झाला होता.

दरम्यान मनोहर पर्रिकर यांच्या मृत्यूनंतर गोवा सरकारमधील समीकरणे बदलण्यास सुरवात झाली होती. पर्रिकरांनंतरचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी भाजप आघाडी सरकारचा कारभार हाती घेतला होता. तसेच गोव्यात भाजपचे पूर्ण बहुमताचे सरकार असायला हवे असे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने गोवा भाजपला सांगितले होते.