मुंबई: आता लवकरच देशातील पाच राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष मोर्चे बांधणी करताना दिसत आहेत. तसेच एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणं देखील सुरू झाले आहे. निवडणूका होणाऱ्या पाच राज्यांमध्ये गोव्याचा देखील समावेश आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोठे वक्तव्यं केले आहे.
संजय राऊत (Sanjay Raut) गोव्यातील महाविकास आघाडीबाबत बोलताना म्हणाले, गोवा विधानसभेच्या आगामी निवडणुकीत (Goa Elections) महाविकास आघाडीची मोट एकत्र बांधण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या (Congress) स्थानिक नेत्यांमुळे यशस्वी होऊ शकला नाही, अशी टीका राऊत यांनी कॉंग्रेसवर केली आहे. काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना आपला पक्ष राज्यात अजूनही मजबूत आहे, आपण बहुमताने सत्तेत येऊ, अशी आशा बाळगत असल्याचे संजय राऊत म्हणाले.
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादीने (NCP) मागितलेल्या जागा सोडण्यासही काँग्रेस नेत्यांनी नकार दिला. त्यामुळे भविष्यात उगाच ताणतणाव नको म्हणून शिवसेनेने स्वबळावर लढण्याची तयारी सुरु केली आहे. आमच्याकडे १५ ते १६ जागांवर चांगले उमेदवार आहेत, असे संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
महत्वाच्या बातम्या:
- युपीत भाजपला मोठा धक्का; ‘या’ मंत्र्याने केला सपामध्ये प्रवेश
- ”कोरोनाने आपली विकेट घेऊ..” म्हणत Mumbai पोलिसांचं ट्विट व्हायरल
- ‘आता पर्यंत आम्ही तुम्हा खूप…’; न्यायालयाचा परमबीरसिंग यांना दणका
- “विकृत पोस्ट करणारी विषवल्ली मुळासकट छाटून टाकायला हवी”
- मोठी बातमी! टाटा कंपनीची आयपीएलमध्ये एंट्री; बीसीसीआयने दिली ‘ही’ संधी
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<