मुंबईत जाऊन मुख्यमंत्र्यांना विचारणार जाब ; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

औरंगाबाद / प्रतिनिधी : आज ( ४ नोव्हेंबर ) स्मारकीय ध्वजारोहणच्या निमित्ताने माननीय मुख्यमंत्री औरंगाबाद दौऱ्यावर येणार होते. त्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन त्या बैठकीमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या मागण्यांचं नेमक काय झाल  ? याचा जाब मुख्यमंत्र्यांना विचारणार होते. पण शुक्रवारी सायंकाळी मुख्यमंत्र्यांनी औरंगाबाद चा दौरा रद्द केल्याचे समजताच मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी मुख्यमंत्र्यांना मुंबईत जाऊन जाब विचारणार असे प्रसिद्धी पत्रक जाहीर केले .

कोपर्डी प्रकरणातील आरोपीना फाशी , मराठा समाजाला आरक्षण , स्वामिनाथन आयोगाची शिफारस , शेतमालाला हमीभाव या सर्व मागण्या साठी सकल मराठा समाजाच्या 57 वा मोर्चा 9 ऑगस्ट 2017 रोजी मुंबई येथे काढण्यात आला, यावेळी मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला मागण्या पूर्ण होतील अशी आश्वासने दिलीत परंतु अद्याप कोणत्याही प्रकारची मागणी सरकारने पूर्ण केली नाही. नेमक मराठा समाजाच्या मागण्यांच काय झालं ? याचा जाब सकल मराठा समाजातर्फे विचारण्यात येणार होता. परंतु मुख्यमंत्र्यांनी दौरा रद्द केल्या मुळे, मराठा क्रांती मोर्च्या च्या समन्वयकांनी प्रसिद्धी पत्रक काढावे लागले ज्यात मुख्यमंत्र्यांना मुंबईत जाऊन जाब विचारणार ही बातमी समाजाच्या समोर ठेवली होती. या प्रसिद्धीपत्रामध्ये माजी आमदार कल्याणराव काळे, डॉ शिवानंद भानुसे, माजी आमदार नामदेव पवार, अपासाहेब कुढेकर, कैलास पाटील, सुरेश काकडे, आदींची स्वाक्षऱ्या आहेत.Loading…
Loading...