तर मग पाकिस्तानला जा…

“पाकिस्तान क्रिकेट टीमच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधील विजयानंतर भारतामध्ये राहणाऱ्या काही पाकप्रेमींनी आनंदोत्सव साजरा केला आता अशा लोकांनी पाकिस्तानमध्येच जाऊन रहाव ” असा सल्ला राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष गैरुल हसन रिझवी यांनी भारतातील पाकिस्तान प्रेमींना दिला आहे.

उत्तर प्रदेशातील मेरठ येथे एका इफ्तार पार्टी दरम्यान रिझवी यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी भारतामध्ये पाकिस्तानच्या विजयावर आनंद साजरा करणाऱ्याना चांगलंच धारेवर धरल

भारतामधील काही लोकांनी पाकिस्तानच्या विजयला ईदच्या आधीची ईद अस हि म्हंटल. मात्र, माझं अशा लोकांना सांगण आहे की ज्यांना पाकिस्तानच्या विजयाने आनंद होतो त्यांनी खुशाल पाकिस्तानात जाऊन रहावं किव्हा आपलं पाकप्रेमी ह्रदय काढून पाकिस्तानला पार्सल करावं अशी खरमरीत टीका हि रिझवी यांनी केली आहे.