मोदींच्या डोकेदुखीत वाढ; सोशल मिडीयावर #Go Back Modi ची लाट

#gobackmodi

टीम महाराष्ट्र देशा: कावेरी पाणी वाटपाच्या प्रश्नावरून तामिळनाडूचे राजकारण चांगलेच तापले आहे. त्यामुळे चेन्नईमध्ये खेळवले जाणारे आयपीएल सामने देखील दुसरीकडे हलवण्यात आले आहे. दरम्यान संरक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या कंपन्यांचा एक्स्पोला आजपासून चेन्नईमध्ये सुरुवात होणार आहे, याच उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार. मात्र मोदींच्या दौऱ्यावर आधी ट्विटरवर #GoBackModi ट्रेंड होत आहे.

सुमारे १२० वर्षापासून कर्नाटक आणि तामीळनाडूमध्ये कावेरी पाणी प्रश्नाचा वाद सुरु आहे. याच दरम्यान मागील महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडूला मिळणाऱ्या पाण्यामध्ये कपात केल्यानं त्याचा फायदा कर्नाटकला होणार आहे. यातूनच आपल्यावर अन्याय झाल्याची भावना तामिळनाडूतील नागरिकांमध्ये आहे.

केंद्रात असलेल्या मोदी सरकारने सर्वोच्च न्यायालयात तामिळनाडूची भूमिका नीट मांडली नसल्याची भावना लोकांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे नाराज असलेल्या जनतेकडून नरेंद्र मोदींच्या तामिळनाडू दौऱ्याच्या निमित्ताने त्यांच्या विरोधात मोहीम सुरु करण्यात आली आहे. त्यामुळेच #गोबॅकमोदी हा हॅशटॅग वापरुन अनेकांनी ट्विटरवर त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.