fbpx

आर्थिक निकषांवर भारत स्त्री पुरुष समानतेच्या वाटेवर

वेबटीम-गेली कित्येक वर्ष स्त्री पुरुष समानतेचा नारा लावला जात आहे.खरच स्त्री पुरुष समानता आली आहे का ? आर्थिक निकषांचा विचार केला तर बऱ्यापैकी स्त्री पुरुष समानता मानली जात आहे असे मत डब्ल्यूईएफ या आंतरराष्ट्रीय संस्थेने मांडले  आहे.

जिनेव्हा-आधारित जागतिक आर्थिक मंच (डब्ल्यूईएफ) या आंतरराष्ट्रीय संस्थेने जगभरात स्त्री पुरुषांना कोणत्या आधारे वेतन दिले जाते यांचे सर्वेक्षण केले आहे.या मध्ये निरीक्षण करताना कोणत्याही कामाचे मूल्यमापन कोणत्या आधारे केले जाते. जर एकाद्या पदासाठी स्त्री असेल तर तिला कमी वेतन दिले जाते का? यांचे निरीक्षण केले.या निरीक्षणात भारताचा १०३ वा क्रमांक लागला आहे.म्हणजे भारता मध्ये इतर देशाच्या तुलनेत फार मोठ्या प्रमाणात  आर्थिक भेदभाव केला जात नाही. जगातील १३० देशांची यादी जाहीर केली आहे.त्यात भारताचा १०३ वा क्रमांक लागतो.

या यादीत  रशियन फेडरेशन १६ व्या स्थानावर आहे, त्यानंतर चीन ३४ व्या, ब्राझील ७७ व्या आणि दक्षिण आफ्रिका ८७ व्या स्थानावर आहे.या सर्व देशाच्या तुलनेत भारताची अवस्था जास्त चांगली आहे.
दक्षिण आशियाई देशांमध्ये भारत श्रीलंका आणि नेपाळपेक्षा कमी स्थानावर आहे, परंतु शेजारच्या बांगलादेश आणि पाकिस्तानपेक्षाही जास्त आहे.