fbpx

ग्लेन मॅक्ग्राने दिला टीम इंडियाला विजयाचा कानमंत्र

Glenn McGrath

चेन्नई : इंग्लंड-भारतादरम्यान कसोटी मालिकेला येत्या १ तारखेपासून सुरुवात होत. भारताने इंग्लंड दौऱ्यात वन डे आणि टी-२० मध्ये चांगली सुरुवात केली होती, मात्र इंग्लंडने एकदिवसीय मालिकेत विजय मिळवून भारताचा हिशोब चुकता केला. आॅस्ट्रेलियाचा माजी दिग्गज ग्लेन मॅक्ग्रा याने भारतीय खेळाडूंना विजय मिळविण्यासाठी कानमंत्र दिला आहे.

विराट अॅन्ड कंपनीने प्रतिस्पर्धी गोलंदाज जेम्स अॅन्डरसनच्या गोलंदाजीवर वर्चस्व गाजवावे. त्याचे वेगवान आणि हवेत वळण घेणारे चेंडू अलगद टोलवायला हवेत, असा सल्ला आॅस्ट्रेलियाचा माजी दिग्गज ग्लेन मॅक्ग्रा याने भारतीय खेळाडूंना दिला. अॅन्डरसनचे हवेत वळण घेणारे वेगवान चेंडू खेळताना फलंदाज हावी झाल्यास भारताला मालिका विजय मिळविणे कठीण जाणार नाही. भारताला मालिका विजय मिळवायचा झाल्यास फिरकी गोलंदाजांना देखील वर्चस्व गाजविणे गरजेचे आहे असल्याचं त्याने म्हटलं आहे.

याशिवाय भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या भात्यात सर्व प्रकारचे फटके आहेत. मैदानावर विराट नेहमीच व्यक्त होतो. भावना दडवून ठेवण्याचा त्याचा स्वभाव नाही. इंग्लिश वातावरणातही आपण धावा करु शकतो हे विराटला आता दाखवून द्यावे लागेल असं देखील त्याने म्हटलं आहे.

संतापजनक! रवींद्र जाडेजाची पत्नी रीवाबाला भररस्त्यात पोलिसाची मारहाण