ग्लेन मॅक्सवेलने केला भारतीय तरुणीसोबत साखरपुडा,जाणून घ्या कोण आहे ‘ती’ ?

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया संघाचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल ने बुधवारी सोशल मिडीयावर गर्लफ्रेंड विनी रमन (Vini Raman) सोबत साखरपुड्याची घोषणा केली. मॅक्सवेल आणि विनी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ही गोष्ट त्यांच्या चाहत्यांसह आणि नातेवाईकांशी शेअर केली आहे.

मॅक्सवेलनं गर्लफ्रेंड विनी रमनला रिंग घालत लग्नाची मागणी केली. याबाबतची पोस्ट त्यानं इन्स्टाग्रामवर करत विनीला आफला जोडीदार बनवल्याचं जाहीर केलं आहे. या पोस्टमध्ये विनी हातामधील रिंग दाखवत आहे. मॅक्सवेलनं फोटोच्या कॅप्शनमध्ये रिंगचा इमोजी टाकला आहे. दोघेही या फोटोत कमालीचे खूश दिसत आहेत.

Loading...

याआधी मॅक्सवेलनं मानसिक स्वाथ्यामुळं क्रिकेटमधून विश्रांती घेतली होती. त्यावेळी ग्लेन मॅक्सवेलने, ‘माझी जोडीदार विनीने मला सल्ला दिला की मी कोणाशी तरी बोलावे. माझी मानसिक ताणतणाव ओळखणारी ती पहिली व्यक्ती होती. मी खरतर तिचे आभार मानले पाहिजेत”. मॅक्सवेल आणि विनी 2 वर्षांपासून एकत्र आहेत, मॅक्सवेलच्या प्रत्येक कठिण प्रसंगी विनी त्याच्यासोबत होती.

ग्लेन आणि विनी यांचे बरेच फोटो आतापर्यंत वायरल झाले आहेत. फोटोंमध्ये ग्लेन आणि विनी यांच्यामधील जवळीक त्यांचे नाते सांगून जात आहे. आता हे दोघे साखरपुड्यानंतर लग्न कधी करणार, याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
रुग्णालयाची अवस्था पाहून तुकाराम मुंढेंचा संताप; जमत नसेल तर घरी जा...
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
निलंग्यातील मज्जीदमधून १२ परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात !
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
...त्यामुळे भारताला कोरोनापासून अमेरिके इतका धोका नाही, या तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले मत
माझं शरीर आहे, माझी मर्जी मी माझ्या शरीरासोबत तेच करेन ! जे मला योग्य वाटतं
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
कोरोना व्हायरस संदर्भात भारतीय शास्त्रज्ञांना मोठं यश