मागासवर्गीय आयोग, कोर्ट ही कारणे सांगून सरकार वेळकाढूपणा करत आहे : नितेश राणे

नितेश राणे

कोल्हापूर : सरकारची खरच इच्छाशक्ती असेल तर आरक्षण मिळू शकते. नोव्हेंबर पर्यंत वाट न पाहता सरकारने त्वरित निर्णय घेऊन तरुणांच्या आत्महत्या थांबता येईल. मराठा समाज इतर समाजासारखा नाही त्यामुळे सरकारने त्याची तुलना इतरांशी करू नये. मराठा समाजाचा प्रत्येक कार्यकर्ता हा या समाजाचे नेतृत्व करतो. सरकारने मागासवर्गीय आयोग, कोर्ट यासारखी करणे सांगत वेळकाढूपणा करू नये. सरकारने त्वरित अध्यादेश काढून मराठा समाजासाठी आरक्षण जाहीर करावे, असे आमदार नितेश राणे कोल्हापुरात म्हणाले.

आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजच्या वतीने कोल्हापूरमध्ये ठिय्या आंदोलनाला भेट देण्यासाठी आमदार नितेश राणे आले होते. त्यावेळी ते आंदोलकांशी बोलत होते. त्यानंतर राणे पत्रकारांशी बोलताना म्हणाले कि, मराठा आरक्षणावरून आमदारांनी राजनामा देऊ नये. विधिमंडळात मराठा आरक्षणासाठी मराठा आमदारांचा पाठिबा गरजेचे आहे. जर मराठा आरक्षणावर विधिमंडळात मतदान झालं तर मराठा आमदारांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. सध्या विधिमंडळात मराठा आमदारांची संख्या हि १४७ एवढी आहे. त्यामुळे सरकारवर दबाव आणण्यासाठी या संख्याबळाचा फायदा होईल.

लोकशाहीत सरकारपर्यंत आवाज पोहोचवण्यासाठी मतदानाद्वारे बोलावे लागते हे मराठा समाजाने लक्षात घेतले पाहिजे. इतर समाज आपापली ताकद मतदानातूनच दाखवीत असतो त्यामुळे त्यांच्या आरक्षणाला तिळमात्र हि धक्का लागत नाही. मतदानातून रोष दाखवल्याशिवाय सरकारला कुठलीच गोष्ट गांभीर्याने घेत नाही हि बाब लक्षात घेऊनच मराठा समाजाने आरक्षणासाठी मतदानातूनच शक्तीप्रदर्शन करावे, असे आव्हान नितेश राणेंनी केले.

मराठ्यांचा संयम संपतोय; वेळीच निर्णय घ्या – अजित पवार

राणेंना भाजपची ऑफर अमान्य ?

आरक्षण आंदोलनात आगीत तेल ओतण्याचे काम कोणी करू नये : नितीन गडकरी