मतदाराला दोन हजार रुपयांची एक नोट दिली तरी आता सहज मत विकत घेता येते

टीम महाराष्ट्र देशा- देशातील काळा पैसा बाहेर काढण्यासाठी मोदी सरकारने नोटाबंदी जाहीर केली. मात्र, नोटाबंदी हा राजकीय कट असल्याचा आरोप आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला आहे. या राजकीय कटामुळे मोदी यांनी मतदारांचे मत विकत घेण्याचे काम अधिक सोपे केले आहे असं मत नायडू यांनी व्यक्त केलं आहे. विशाखापट्टनममध्ये सुरू असलेल्या इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह साऊथ 2018 मध्ये नायडू बोलत होते.

खिशात दोन हजाराचे एक बंडल घेऊन फिरले आणि मतदाराला एक नोट दिली तरी आता सहज मत विकत घेता येते. या उद्देशानेच त्यांनी दोन हजार रुपयांची नोट आणली आसा आरोपही त्यांनी केला. यासाठीच आपण नोटाबंदीला विरोध केला होता, असे त्यांनी स्पष्ट केले. आपण पाच वर्षे जनतेची सेवा केली आहे. जनहिताची अनेक कामे आपल्या सरकारने केली आहेत त्यामुळे मते विकत घेण्याची वेळ आपल्यावर येणार नाही, असेही ते म्हणाले.