मुंबई : दोन वर्षांपासून कोरोनामुळे (Corona) जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेले काही महिने कोरोनाला ब्रेक लागला होता. परिस्थिती पूर्वपदावर येत होती. परंतु आता कोरोनाच्या नव्या विषाणुने संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. दक्षिण अफ्रिकेत आढळलेल्या ‘ओमायक्रॉन’ (Omicron) हा विषाणू जास्त वेगाने फैलावणारा असल्याने अनेक देशांनी धास्ती घेतली आहे. असे असतांनाच मुंबईत आता कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याचे चित्र बघायला मिळत असून काल एका दिवसात मुंबईत रुग्णांचा आकडा २० हजारांच्या पार गेला आहे. त्यामुळेच आता मुंबईत लॉकडाऊन लागणार का? या प्रश्नांना उधाण आले आहे. असे असतांनाच आता मुंबईतील सध्याची परिस्थिती पाहता लॉकडाऊनची गरज नाही, अशी दिलासादायक माहिती पालिका आयुक्त इकबाल चहल(Iqubal Chahal) यांनी दिली आहे.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना चहल म्हणाले की,’गुरुवारी मुंबईत २० हजारच्या वर केसेस झाल्या. त्यापैकी फक्त ११० लोक ऑक्सिजन बेडवर गेले. ११८० लोक रुग्णालयात दाखल झाले. ३५ हजार पैकी फक्त ५९९९ बेड भरले आहेत. ८४ टक्के बेड रिकामे आहेत. त्यामुळे ऑक्सिजनचा वापर नगण्य आहे, बेड रिकामे आहेत. या पार्श्वभूमीवर कोणत्याही लॉकडाऊनची गरज नाही’, असे चहल म्हणाले आहेत.
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’रुग्णसंख्या कमी असतानाही ऑक्सिजनचा किंवा आयसीयूचा वापर वाढला, तर आपण निर्बंधांचा विचार करू. रुग्णसंख्या कमी-जास्त होत असेल, तर त्याचा फरक पडत नाही. आज २० हजार ४०० रुग्णसंख्या झाली आहे. काल ६४ हजार चाचण्या केल्या होत्या, आज ७२ हजार चाचण्या केल्या आहेत. पण आता आकड्यांवर लॉकडाऊन होऊ शकत नाही’, असे चहल यांनी स्पष्ट केले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- ‘कोरोना, भीती आणि धास्ती असे भूत जगाच्या मानगुटीवर बसलेत’
- निवडणूक खर्चाची मर्यादा वाढवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय
- ‘पंतप्रधान मोदींच्या सुरेक्षेबाबत कोणतीच तडजोड होता कामा नये’
- “भुजबळांनी मला शिकवू नये, त्यांना काय माहिती आयुष्यातील…”, चंद्रकांत पाटीलांनी सुनावले
- “पंतप्रधान देशाचे आदरणीय नेते आहेत, पण त्यांना हे नाटक शोभत नाही”
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<