‘पुण्याचे महापौर पद आम्हाला द्या!’, रिपाइंचे अध्यक्ष आठवलेंची मागणी

‘पुण्याचे महापौर पद आम्हाला द्या!’, रिपाइंचे अध्यक्ष आठवलेंची मागणी

blank

पुणे : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मित्रपक्ष भाजपाला इशारा दिला आहे. ‘भाजपाने राज ठाकरे यांच्या नादी लागू नये, भाजपाला मनसेमुळे नुकसान होऊ शकते’, असे मत त्यांनी व्यक्त केल आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी रिपाइंला पुण्यात महापौरपद मिळावे अशी मागणीही केली आहे.

‘राज्यातील महापालिका निवडणुकीत आमचा पक्ष भाजपासोबत राहणार आहे. पुण्यात महापौर पद मिळाले पाहिजे. तसेच मुंबईमध्ये उपमहापौर मिळाले पाहिजे. पुण्यात १५ ते २०, तर मुंबईमध्ये ३० ते ३५ जागा मिळाल्या पाहिजेत अशी भूमिका त्यांनी घेतली.

भाजप मनसेच्या नादाला लागल्यास ‘रिपाइं’ भाजपचा नाद सोडेल का, असे विचारल्यावर ‘आम्ही त्यांचा नाद सोडला तरी ते आमचा नाद सोडणार नाहीत,’ असे आठवले म्हणाले. स्वतंत्र चिन्हावर लढायचे की, भाजपच्या हे अजून ठरले नाही. मात्र, एकत्र निवडणूक लढवणार असून, मागासवर्गीय आरक्षण पडल्यास पुण्यात महापौर आणि मुंबईत उपमहापौर रिपाइंला मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला शब्द दिल्याचेही त्यांनी नमूद केले.

‘भाजपाला आरपीआय असताना मनसेची गरज नाही. मनसेमुळे भाजपाचे नुकसान होऊ शकतं. त्यांचा परप्रांतीय मुद्दा बघून भाजपाने राज ठाकरे यांच्या नादी लागू नये. आम्ही भाजपाचा नाद सोडला, तर ते आमचा नाद सोडणार नाही’ असा सूचक इशारा रामदास आठवले यांनी भाजपाला दिलाय.

महत्वाच्या बातम्या