fbpx

कामगारांचे कारखान्याकडे असलेले थकीत 14 कोटी रुपये त्वरित द्या,अन्यथा आत्मदहन करू

फुलंब्री – समृद्धी महामार्गात देवगिरी सहकारी साखर कारखान्याची सावंगी येथील जमीन जात असून या जमिनीचे सुमारे 20 ते 25 करोड रुपये पुढील काही दिवसामध्ये येणार आहे. त्यामुळे येथील कामगारांचे कारखान्याकडे 14 कोटी रुपये थकीत असलेले प्रथम देण्यात यावे अन्यथा आत्मदहन करू असा इशारा कामगार युनियन च्या वतीने महाराष्ट राज्य सहकारी बँक , जिल्हा अधिकारी औरंगाबाद, कामगार उपआयुक्त, पोलीस अधीक्षक ग्रामीण यांना नुकतेच निवेदनाद्वारे दिले आहे .

निवेदनात म्हटले आहे की, फुलंब्री येथील देवगिर सहकारी साखर कारखान्याकडे येथील कामगारांचे मागील कित्येक वर्षांपासून व्याजासह 14 कोटी रुपये थकीत आहे . कामगारांनी कारखान्यात काम केली खरे परंतु त्याचा त्यांना मोबदला देण्यात आलेला नाही . त्यामुळे येथील कामगारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे . त्यात कारखाना बंद अवस्थेत पडलेला आहे . असे असताना कामगारांचा दैनंदिन खर्च, त्यांच्या मुलांचे शिक्षण, लग्न आदींना लागणार खर्च झाला आहे त्यात अनेक कामगारांचे वय झाले असल्यामुळे दुसरे काम आता करणे श्यक्य नाही शिवाय करख्याण्याच्या पगाराच्या भरवश्यावर उसनवारी , उधारी , खाजगी कर्जाचा डोंगर डोक्यावर मोठा झाला आहे . त्यामुळे कामगारांना दुसरा आधार राहिलेला नसल्याने येथील कामगारांना मोठे हलकीचे जीवन जगावे लावत आहे . त्यामुळे कामगारांचे कामाचे पैसे त्वरित देणे आवश्यक आहे .

कारखान्याकडे सावंगी येथे असलेल्या जमीनीतून नागपूर – मुंबई समृद्धी महामार्ग जात आहे त्याचा मिबदला स्वरूपात कारखान्याला पुढोल काही दिवसात 20 ते 25 कोटी रुपये येणार आहे त्यामुळे या पैशातून प्रथम कामगारांचे सर्व पैसे देण्यात यावे असे निवेदनात म्हटले आहे .