उज्ज्वल निकम यांना ‘महाराष्ट्र भूषण’ द्या- नितेश राणे

टीम महाराष्ट्र देशा: संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणातील तिन्ही दोषींना नगरच्या सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. कोपर्डी प्रकरणात न्यायालयाने तिन्ही नराधमांना सुनावलेल्या शिक्षेवर आमदार नितेश राणे समाधान व्यक्त केले आहे.

या घटनेतील नराधमांना फाशीच्या तख्तापर्यंत पोहोचवणाऱ्या विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार द्या अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी केली आहे.