हिरकणी चित्रपटाला थिएटर द्या, नाहीतर…

टीम महाराष्ट्र देशा – ऐतिहासिक घटनेवर आधारित ‘हिरकणी’ हा मराठी चित्रपट २४ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाला चित्रपटगृह मिळावे, यासाठी मनसे चित्रपट सेना मैदानात उतरली आहे. कारण याच दिवशी बॉलिवूडचा ‘हाऊसफुल 4’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

‘हाऊसफुल 4’ मुळे हिरकणी या चित्रपटाला चित्रपटगृह मिळण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे मनसेची चित्रपट सेना मैदानात उतरली आहे. मराठी चित्रपटाला चित्रपटगृह मिळावी, तो आमचा हक्क आहे, अशी भूमिका मनसेने घेतली आहे. मराठी चित्रपटाला स्क्रीन्स मिळाल्या नाहीत तर खळखट्याक होईल, असा इशारा मनसेने दिला आहे.

मनसेच्या भूमिकेविषयी बोलताना चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ‘दर आठवड्याला मराठी चित्रपटांना स्क्रीन मिळवण्यासाठी भांडावं लागत असेल, तर ती चुकीची गोष्ट आहे. ‘ट्रिपल सीट’ आणि ‘हिरकणी’ हे दोन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. हिरकणी चित्रपटासारखा ऐतिहासिक विषय घेऊन मराठीमध्ये चित्रपट होतो आहे, तर त्याला स्क्रीन्स मिळायला हव्यात.

लहानपणापासून ती कथा ऐकत आलोय. त्यामुळे अशा चित्रपटांसाठी महाराष्ट्रात थिएटर मिळणार नसतील, तर आंदोलनाशिवाय पर्याय नाही असेच म्हणावे लागेल. मग खळ्ळखट्याक करूनच थिएटर मालकांचे डोळे उघडणार असतील तर ते करू, असं खोपकर म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या